सासू माझी मायाळू दीर माझे हौशी, .....रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी.
1 0
सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले, .....रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडविले.
0 0
तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा, .....रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा.
0 0
जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण, .....रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.
0 0
मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, .....रावांचे नाव घेतेसंक्रातीच्या दिवशी.
0 0

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी, .....रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.
0 0
पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, .....रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.
0 0
नदीकाठी मोर बघा कसा नाचतो, .....रावांनी घेतली साडी रंग कसा खुलतो.
0 0
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, .....रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
0 0
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी, .....रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.
0 0

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, .....रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
0 0
तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, .....रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
0 0
असंख्य तारे नभात पाहावेत निरखून, .....रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून.
0 0
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, ...... रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.
0 0
Close