नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा,
____ आणि ___ चा आहे आज साखरपुडा.
मागवा आज, भरपूर पेढ्यांचा पुडा,
कारण ____ आणि_____ चा आहे आज साखरपुडा.
हातावर मेहंदी, आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा,
________रावांसोबत झाला, अखेर साखरपुडा.
विडा, सुपारी, फुल, पेढे आणि साखरेने भरले ताट,
____ रावांनी अंगठी घालून केली, साखरपुड्याची सुरवात.
साखरपुडा आहे आमचा _______तारखेला सर्वांना कळवले,
__________रावांनी अखेर, माझ्या घरच्यांना मनवले.
नाण्याच्या दोन बाजू, छापा आणि काटा,
_________ रावांसोबत साखरपुडा झाला, आता पेढे वाटा.
मला तुझ्या प्रेमाची, लागली आहे चाहूल,
______ रावांचे नाव घेऊन, सासू सासऱ्यांचे पडते पाऊल.
जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास…
__रावांना देता देता, __चा घास
__ला भरवण्यात, येतो आनंद आगळा…
घे पटकन नाहीतर, मी फस्त करेन सगळा