गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
हळदी कुंकवा दिवशी ...चे नाव घेते, सौभाग्य माझे
भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
----- चे नाव घेते खास तुमच्या करिता
साजुक तुपात , नाजुक चमचा ,
.... चे नाव घेते आशिर्वाद असु दे तुमचा
कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
----- चे नाव घेते माझ्या मनात
थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
----- च्या जीवावर भाग्यशाली झाले
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… चे नाव घेते, सार्या जणी बसा
श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा
श्रावणात येई, पावसाला जोर…
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर