कृष्णाच्या बासरीने होती, गोपिकांची मने घायाळ…
__ रावांची दाढी म्हणजे, सिंहाची जणू आयाळ
रेशमी सदर्याला, प्लास्टीकचे बक्कल…
__रावांना, तिशीतच पडले टक्कल
काश्मीरहून आणलाय, सुंदर रेशमी रुमाल…
___ बरोबर असले की, कशाला हवा हमाल?
__भेटल्यापासून, झालो मी पूर्ण…
पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण
जुन्या भिंतीवर लावलं, नवीन नवीन कॅलेंडर…
__रावांचे पोट म्हणजे, भरलेले गॅस सिलेंडर
मोगऱ्याच्या झाडावर, फुलल्या होत्या कळ्या…
__रावांचे दात म्हणजे, मोडक्या दरवाज्याच्या फळ्या
विड्याच्या पानात, पावशेर कात…
__रावांच्या कमरेत, घातली गाढवाने लाथ
उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार…
आंघोळ कर__, नाहीतर लोकं होतील पसार
__व माझी Lovestory एकदम सच्ची…
गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची
चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू…
__रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू
डास चावला की, येते अंगाला खाज…
__चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज
काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज…
__नी वजन काटा मोडलाय आज
शंकराच्या पिंडीला, नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
चांदीच्या ताटात, __चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय
लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी
__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.