वोडाफोन, एयरटेल पेक्षा, भारी आहे जिओ सिम,
______आणि _____ कडून सर्वांना, मानाचा जयभीम.
भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, वंदन करते खाली वाकून,
_________ रावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून.
दिवस रात्र एक करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्यायाविरुद्ध झटले,
_______ रावांचे बोलणे, मला पहिल्या भेटीतच पटले.
स्त्री पुरुष सर्वाना, समान दिले बाबासाहेबांनी हक्क,
______ सोबत झाले, अखेर माझे लग्न पक्क.
जयभीम च नाव, जगी गाजत,
______ राव वरातीत नाचायला, नाही लाजत.
भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचा फोटो, आपल्या सर्वांच्या घरी असावा,
________ रावांचा सहवास, मला प्रत्येक जन्मी मिळावा.
डॉ. बाबासाहेबांसारखा महामानव, पुन्हा कधी जन्म घेणार नाही,
_______ रावांसारखे पती, शोधूनही मिळणार नाही.
माता रमाईने बाबासाहेबांना, नेहमी दिली साथ,
_____ रावांचे नाव घेते, सर्वांच्या आशीर्वादाने घ्या आत.
आज लग्नामध्ये, खूप मोठी होती वरात,
_____ रावांसोबत जयभीम बोलून, पाऊल टाकते घरात.
बाबासाहेबांनी दिवस रात्र अभ्यास करून मिळवलेल्या पदव्या, आजही कोणी घेतल्या नाही,
________ सारखी प्रेमळ बायको, शोधूनही मिळणार नाही.
कलम आणि कायदा, बाबासाहेबांची लेखणी आहे,
______ माझी, खूप देखणी आहे.
भारताच्या तिरंग्याला, अशोक चक्राची खून,
_____ रावांचे नाव घेते ______ ची सून.
गौतम बुद्धांच्या विहाराला, सोन्याची विट,
______ रावांचे नाव घेते, लक्ष ठेवा नीट.
भारत देश चालतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर,
__________ रावांनी अखेर कब्जा केला, माझ्या मनावर.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे, आज जनता आहे सुखी,
______ रावांचे नाव, सदा माझ्या मुखी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारत देशाची शान,
_______ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला, माझ्या मनात काय घडतंय,
_____ तुला बघून दिवाना झालोय, माझं काळीज धडधडतंय.
माझा जीव, तुझ्या मध्ये अडकलाय,
_____ माझा हृदय फक्त, तुझ्यासाठी धडकलाय.
मागे तुझ्या वेडा पिसा, दूर करू नको मला,
_____ एकदा हो म्हण, वर्ल्ड टूर ला न्हेईन तुला.
गणपती बाप्पाच्या आगमनाला, झाली आपली भेट,
_______ ला केली, पहिल्या भेटीतच सेट.